लोणी येथील कोल्हापुरहून आलेल्या 22 मजुरांना सरपंच माधव पाटील यांनी तपासणी करून गावात घेतले
उदगीर( प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील लोणी येथील डांबराच्या कामासाठी कोल्हापूर येथे काही महिन्यापूर्वी बावीस मजूर गेले होते हे सर्व मजूर कोल्हापूर येथे अडकून पडले होते. ते सर्व मजूर आज बारा वाजता लोणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सरपंच माधव पाटील यांनी बोलावून घेऊन बसवण्यात आले व हेर येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी वाघमारे आरोग्य सहाय्यक परमेश्वर खटके, आरोग्य सहायक जी बी भांजे, तसेच त्यांची सर्व टीम येऊन सर्वच्या सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली. व सर्वांना 14 दिवस घरांमधे राहण्याचा सल्ला देवून व मार्गदर्शन करून घरी पाठवून देण्यात आले. कोल्हापूर येथून आलेले शेख आयुब, सयदाबि शेख, आयुब, हुसेन शेख, अल्लाउद्दीन शेख, कादर दिल, शेख तहसीन, साहिल बापूराव, सूर्यवंशी मुन्नाभाई, अतुल यादव, सूर्यवंशी जनार्दन, कांबळे सहवास, कांबळे अर्चना, कांबळे पूजा, कांबळे स्वाती, कांबळे ज्योती गुलपुरे बसवराज, राम घुगे, व्यंकोबा करंजे, शेख मोहीम, बालाजी वाघमारे, शेख आदम हे सर्व मजूर त्यांच्या घरी पाठवुन देण्यात आले. व त्यांच्या कडून घराबाहेर निघणार नाही अशी शपथ घेण्यात आली. यासाठी ग्रामपंचायत क्लार्क माधव सोलापूर यांनी परिश्रम घेतले.