कोरोना संबंधित कठीण प्रसंग उद्भवल्यास किंवा गंभीर अडचण आल्यास,ना संजयभाऊ बनसोडे यांच्या_कार्यालयाशी संपर्क..साधावा,तातडीने_सहकार्य_होईल

कोरोना संबंधित कठीण प्रसंग उद्भवल्यास किंवा गंभीर अडचण आल्यास,ना संजयभाऊ बनसोडे यांच्या_कार्यालयाशी संपर्क..साधावा,तातडीने_सहकार्य_होईल


करोना #लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऊदगीर जळकोट विधानसभा  मतदार संघाचे ना संजयभाऊ बनसोडे  यांचे आवाहन..


करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण देश आणि राज्य लाॅक डाऊन करण्यात आले आहेत करोना पासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ऊदगीर आणि जळकोट तालुक्यातील जनतेकडूनही या कामी मोलाचे सहकार्य मिळत आहे आगामी काही दिवस अशाच प्रकारे धैर्य आणि संयम दाखवून समाजातील सर्वच घटकांनी करोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे.


असे सांगून अपवादाने एखादी कठीण परिस्थिती उद्भवल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवावी असेही आवाहन नामदार संजयभाऊ बनसोडे  यांनी केले आहे.


नामदार संजयभाऊ बनसोडे  यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लॉक डाऊन च्या काळात जनतेला जीवनावश्यक वस्तू औषधे व इतर काही गोष्टी मिळाव्यात म्हणून प्रशासन दक्ष राहून काळजी घेत आहे, वाहतूक व्यवस्था बंद झाल्यामुळे काही लोकांची मात्र गैरसोय झाली आहे असले तरीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी आहे त्याच ठिकाणी थांबून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. 


एकाही नागरिकाला कोणतीही अडचण येणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी शासनाने घेतली आहे. तरी अपवादाने एखादी गंभीर परिस्थिती उद्भवली तर माझे कार्यालय मदती साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.


कोरोणा संबंधित व कठीण परिस्थितीत 
यांच्याशी संपर्क साधावा.


------------
गजानन पाटील 96 89 555 707
विठ्ठल चव्हाण 97 67 40 55 55 चंद्रशेखर पाटील 96 65 55 55 61 संग्राम पाटील 94 23 81 32 76