जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्याकडून जिल्हाभरातील आरोग्य केंद्राची पाहणी

जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्याकडून जिल्हाभरातील आरोग्य केंद्राची पाहणी


 


अहमदपूर व चाकूर तालूक्यातील दवाखान्यात अचानक भेट, समाधान व्यक्त


लातूर प्रतिनिधी..कोरोना व्हायरसचा वाढत असलेल्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा परिषद लातूरचा आरोग्य विभाग सज्ज असल्याचे चित्र आहे. त्यात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत असल्याने धास्तीने दवाखान्यात सर्व सुविधा व कर्मचारी वर्ग सतर्क व आरोग्य सेवा देण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.


उदगीर तालूक्यातील वाढवणा येथील आरोग्य केंद्रातील थेट कारवाई नंतर आरोग्य विभागाने चांगलीच धास्ती घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सर्वांना उपचार सुविधा चांगल्या व समाधानकारक मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या प्रत्येक गावात शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशात सर्वांची तपासणी केली जात आहे. सध्यातरी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेला एकही रूग्न लातूर जिल्हयात दिसून आलेला नाही. तरीही आरोग्य विभागाने घेतलेली सकारात्मक भुमिका व बजावत असलेले कर्तव्य निश्चितपणे प्रशंसणीय आहे.


आरोग्य केंद्राच्या तपासणीदरम्यान सर्व बाबींची पाहणी व परिस्थितीची माहिती अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्याकडून घेतली जात आहे. त्याच बरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांच्या देत असलेल्या सेवेबद्दल कौतूकही केले जात आहे. बिकट परिस्थितीत रुग्नांचे हाल होवू नये तसेच, एकही कोरोना संशयीत रस्त्यावर येऊ नये यासाठी काळजी घेण्याची सुचना केंद्रे यांच्याकडून आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिल्या जात आहेत. याच बरोबर नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असेही सांगीतले जात आहे.


 


शिरूर ताजबंद व चापोली आरोग्य केंद्रावर पाहणी..


काल उदगीर व जळकोट तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर आज अचानकपणे अहमदपूर तालूक्यातील शिरूर ताजबंद येथील व चाकूर तालूक्यातील चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक दिली. यादरम्यान समाधानकारक सोयीसुविधा, जिल्हा परिषदेनी घालून दिलेल्या नियमावलीचे योग्य पालन, तसेच रुग्नांची होत असलेली तपासणी समाधानकारक असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत येणाऱ्या काळात अधिक सतर्क राहण्याच्या सुचना केलेल्या आहेत.यावेळी शिरुर ताजबंदचे जि प सदस्य मंचकराव पाटील, चापोली जि प सदस्य महेश कांबळे, मा उपसभापती रामदास बेंबडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हणमंतराव हंडरगुळे, शहराध्यक्ष उदयसिंग ठाकूर हे उपस्थित होते.