माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्यावतीने उदगीर शहरातील गोरगरिबांना धान्याचे वाटप

माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्यावतीने उदगीर शहरातील गोरगरिबांना धान्याचे वाटपसध्या जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातला असून आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे .भारतातही या विषाणूने मोठ्या प्रमाणात पाय पसरत असून अनेकांना याचा संसर्ग झाला आहे . हा संसर्ग थांबवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात व राज्यात संचारबंदी लागू केली आहे...
 या संचारबंदी दरम्यान सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे ... रोज दैनंदिन  काम करून खाणाऱ्या  गोरगरिबांचे  दैना झाली असून  सरकार ही त्यांच्यासाठी  अनेक योजना घेऊन येत आहे...मात्र सध्याला शहरी भागामध्ये  वास्तव्यास असलेल्या अनेक लोकांची उपासमार होत आहे.... अनेकांना एक वेळचं जेवण सुद्धा नशीब होत नसल्यामुळे....  समाजातील काही दानशूर व्यक्ती पुढे येऊन आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न अनेक शहरांमध्ये होताना दिसून येत आहे...


 उदगीर येथेही अनेक समाजसेवी संस्था पुढे आल्या असून आपापल्या परीने जमेल ती मदत करताना दिसून येत आहेत...
 उदगीर शहराचं सात वेळेस नगराध्यक्षपद भूषविलेले माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व त्यांच्या परिवाराच्या वतीने .. आज दिवसभरात साधारण हजारो गोरगरीब लोकांना गहू तांदूळ  साखर बिस्किट आदी साहित्यानी भरलेल्या  पिशव्यांचा वाटप निटुरे निवास या निवासस्थान येथून करण्यात आल... उदगीर येथील मुसा नगर फुलेनगर गांधीनगर अशा अनेक वसत्यातील हजारो लोकांनी याचा लाभ घेतला ...


चौकट


 सध्याचा समय हा संकटाचा समय आहे समाजातील अनेक मानवतावादी दानशूरांनी पुढे येऊन आपापल्यापरीने जमेल तितकी जमेल तेवढी जमेल त्यांना मदत करावे  असे आव्हान माजी नगराध्यक्ष राजेश्वर जी निटुरे यांनी केलं ..