*जिल्हापरिषद अध्यक्षांची प्राथमिक आरोग्य केंद्रावर थेट कारवाई, वाढवण्यात केला स्पॉट पंचनामा..!*
राहूल केंद्रे यांच्या कारवाईने आरोग्य विभागात धास्ती
उदगीर / जळकोट.....जिकडं पाहावे तिकडे कोरोनाची दहशत आहे. प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये व मेडिकलमधून नागरिकांची लूट होत आहे. डेटॉलसारख्या हॅन्डवॉशची चढ्या भावाने सर्रास विक्रि होत आहे. अशा परिस्थितीत सरकारी हॉस्पीटल नागरिकांसाठी आशादायक बनलेले आहे. त्यामूळे तेथील सुविधा चांगल्या असल्या पाहिजेत यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे सरसावले आहेत. त्यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शनिवारी रात्री उशीरा थेट उदगीर व जळकोट तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असून अनियमितता अढळलेल्या केंद्रावर स्पॉट पंचनामा केला आहे.
तरुण तडफदार, कर्तव्याची जाण असलेले, लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी अचानकपणे केलेल्या कारवाईची आरोग्य विभागाने चांगलीच धास्ती घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या धर्तीवर आता प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी पूर्णवेळ हजर राहत आहेत. शिवाय, स्वच्छता व उपाययोजना व्यवस्थित असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून गावोगावी कोरोनासंदर्भात जनजागृती व उपाययोजना आणि उपचार मोहीम हाती घेतली गेली आहे. त्याचे योग्य पद्धतीने नियोजन होतंय का.? प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी उपस्थित आहेत का.? याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी अचानकपणे काही सरकारी हॉस्पीटलमध्ये रात्रीच्यावेळी पाहणी केली. त्यामूळे, एकच खळबळ उडाली असून आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
जळकोट तालूक्यातील जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्र, वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उदगीर तालूक्यातील वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रास अध्यक्ष केंद्रे यांनी अचानकपणे भेट दिली. थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षच रात्रीच्या वेळी हॉस्पीटलमध्ये आल्याने पळापळ सुरू झाली. जळकोट तालूक्यातील वांजरवाडा येथील सोयी सुविधा पाहून त्यांनी डॉक्टर व कर्मचारी वर्गाचे कौतूक केले. तसेच, जळकोट शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही समाधानकारक चित्र दिसून आल्याने त्यांनी आपला दौरा उदगीर तालूक्याकडे वळविला. उदगीर तालूक्यातील वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना चांगलीच अनियमितता दिसून आली. त्यात, डॉक्टर गैरहजर आणि अपूरे कर्मचारी असल्याचे चित्र होते. समोर आलेली गंभीर बाब लक्षात घेवून तात्काळ राहूल केंद्रे यांनी स्पॉट पंचनामा करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणार असल्याचे सांगीतले.
चौकट क्र. १
वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचनामा, तर वांजरवाडा केंद्राचे कौतूक
रात्री केलेल्या पाहणीत उदगीर तालूक्यातील वांजरवाडा येथील आरोग्य केंद्रात अनियमितता व गैरहजरी आढळल्याने पंचनामा केला आहे. तर, जळकोट तालूक्यातील वांजरवाडा आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा व उपाययोजना पाहून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. यापूढेही अशी धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे अध्यक्षांनी सांगीतले असल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.
भेटी दरम्याण केंद्रे यांच्या समवेत पंचायत समिती उदगीरचे सभापती विजयकुमार पाटील, बापूराव राठोड, प्रा.पंडित सूर्यवंशी, उदयसिंह ठाकुर, गणेश गायकवाड, पंडित सूकने, सरपंच दत्त बामने रामानन्द हावा इरशाद शेक आदी उपस्थित होते.