कोरोना व्हायरसची लागण झाल्याची अफवा सोशल मीडिया वरून पसरल्यामुळे उदगीर शहरातील डॉक्टर करपे यांना मनस्ताप.... व्हिडिओ संदेश वायरल करून करावा लागला याचा खुलासा.....
काही दिवसापूर्वी उदगीर येथील डॉक्टर विजयकुमार करपे हे दुबई दौऱ्यासाठी गेले होते ..त्याच काळात कोरोना वायरसने जगभरात
हा हा कार माजवल्या मुळ ते ... आपली टुर आटोपती घेऊन भारतात परत आले ...परत आल्यानंतर विमानतळावरच त्यांची रीतसर वैद्यकीय चाचणी करून त्यांना व्हायरसची लागण झाली नसल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांना घरी पाठवण्यात आल होत... आपल्या परिवारात मुला बाळात ते घरी असतानाच...
सोशल मीडिया वरून डॉक्टर करपे यांना कोरोना वायरस ची लागण झाल्याच्या ,पॉझिटिव रिपोर्ट आल्याच्या अफवा ...सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात व परिसरात पसरल्यामुळे डॉक्टर करपे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी नातेवाईक व हितचिंतक, मित्रांचे शेकडो फोन येऊ लागल्यामुळे ..... त्यांनी आज आपला एक व्हिडिओ संदेश जारी करून सांगव लागल ...मला कसल्याही प्रकारच काही झालेलं नाही मला कोरोनाची लागण झालेली नाही ...अशी माहिती आज लोकांपर्यंत पोहोचावी लागली ....ती केवळ आणि केवळ सोशल मीडिया वरून फिरलेल्या अफवेमुळेच .....
मागील काही दिवसांपूर्वीच चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो अशा अफवा पसरल्या मुळे लोकांनी चिकन खान बंद केल आहे... त्यामुळे लाखो करोडोंची उलाढाल असलेला पोल्ट्री उद्योग , यामुळे संपूर्ण कोलमडला आहे संपूर्णता बंद पडलाय म्हणलं तर वावगं ठरणार नाही ... आज फुकटात जरी चिकन किंवा कोंबडी घेऊन जा म्हटलं तर लोक घेऊन जाण्यास तयार नाहीत ....अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे... ती केवळ सोशल मीडिया वरून पसरलेल्या अफवेमुळेच ....एखदी अफवा जोमात सुरू असलेल्या उद्योगाला कशा पद्धतीने (कोमात पाठवू शकते ) नष्ट करू शकते ते आपण पाहिल आहे .....
पण एखाद्या व्यक्तीला ही कशाप्रकारे याचा त्रास होतो त्याचे उदाहरण म्हणजे उदगीरचे डॉक्टर करपे संदर्भातली अफवा