उदगीर येथील डॉक्टर  दांपत्याच्या वतीने रुग्णांना मोफत कापडी मास्कचे वाटप

उदगीर येथील डॉक्टर  दांपत्याच्या वतीने रुग्णांना मोफत कापडी मास्कचे वाटप



सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूने  थैमान  घातल असून  दैनंदिन  रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे...  कोरोना विषाणू  हा  अतिशय झपाट्याने पसरत असल्यामुळे खबरदारीचा हा एकमेव उपाय आहे... आजही ग्रामीण भागात या विषाणूच्या संदर्भात हलगर्जी  दाखवली जात असून .... या विषाणू चा संसर्ग  होऊ नये  यासाठी  घ्यावयाची  खबरदारी घेतली जात नाही ... ही बाब उदगीर येथील डॉक्टर उदय गुजलवार व सौ सुरेखा गुजलवार या डॉक्टर दांपत्याला  त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मार्फत  लक्षात आली ....तेव्हा या डॉक्टर दाम्पत्यांनी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या कोरोना  विषाणूच्या यासंदर्भात  माहिती देऊन मोफत कापडी मास्कच वाटप करायला या  सुरुवात केली .....आतापर्यंत या डॉक्टर दाम्पत्यांनी 1000 पेक्षा अधिक कापडी मास्क चे वाटप त्यांनी केला आहे. आणि याही पुढे ते मास्तर वाटप करणार असल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू आव्हान करून या झपाट्याने पसरत असलेल्या विषाणूला थांबविण्यासाठी आव्हान केला आहे त्या आव्हानाला त्यांनी समर्थन देत.... 
सर्वांनी दिनांक 22 रोज आपापल्या घरांमध्ये राहून पसरत असलेल्या या विषाणूला थांबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आव्हान त्यांनी याप्रसंगी केलं