कोरोना विषाणूचा शहरात संसर्ग होऊ नये म्हणून उदगीर नगरपरिषद सतर्क... शहरा बाहेरच प्रवाशांचे व वाहनांचे निर्जंतुकीकरण
कोरोना विषाणूचा शहरात संसर्ग होऊ नये म्हणून उदगीर नगरपरिषद सतर्क
उदगीर नगर परिषदेच्यावतीने शहराबाहेरच वाहनांची निर्जंतुकीकरण करण्याची सोय......स्वतः मुख्याधिकारी रस्त्यावर उतरून वाहन थांबून करत आहेत येणार यात प्रवाशांच निर्जंतुकीकरण.......सध्या करुणा व्हायरसने जगभरात हा हा कार माजवला आहे या विषाणूंनी आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे .भारता मध्ये या विषाणूने गेल्या पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.. खासकरून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून पुणे मुंबई येथे या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना काळजी घेण्याचा आव्हान केला असून प्रशासनाला या विषाणूपासून नागरिकांना धोका होऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्यावयाच्या अधिकार व देण्यात आली असून या अनुषंगानेच आता
उदगीर शहरांमध्येही वैद्यकीय अधिकारी उपजिल्हाधिकारी पोलिस अधिकारी नगर परिषदेच्या वतीने ही खबरदारी घेतली जात असून पुणे-मुंबई येथून येणाऱ्या 100 हून अधिक ट्रॅव्हल्स उदगीर शहराबाहेरच राखून त्या सर्व ट्रॅव्हल्स व मुंबई-पुणे पुण्याहून आलेल्या प्रवाशांच्या नोदी घेऊन त्यांना निर्जंतुक करून शहरात प्रवेश देण्याचे काम उदगीर नगर परिषद यांच्या वतीने आजपासून सुरू करण्यात आल आहे
याकामी नगरपरिषदेची टीम घेऊन स्वतः मुख्याधिकारी भारत राठोड ते जातीने उपस्थित राहून याची काळजी घेत आहेत....