जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्याकडून नळगीर आरोग्य केंद्राची पाहणी
सज्जावर राहणे बंधनकारक असताना ग्रामसेवक गैरहजर, केंद्रे यांच्याकडून कानउघडनी
आदेशाचे उल्लंघण करणाऱ्या ग्रामसेवकावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई होणार का.? याकडे जिल्ह्याचे लक्ष..
उदगीर / प्रतिनिधी...कोरोना व्हायरसचा माजलेला कहर पाहता जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्याकडून जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्राची जोरदार तपासनी सुरु आहे. दरम्यान शनिवारी त्यांनी नळगीर प्राथमिक आरोग्य केंद्राची अचानक तपासणी केली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच यंत्रणा जिवाचे रान करताना पहावयास मिळत आहे. अशात लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी आरोग्य केंद्राची धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. उपचाराची कुठलीच कमतरता दिसू नये, सर्वांची योग्य काळजी घ्यावी, होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांकडे विशेष लक्ष द्यावे यासाठी केंद्रे आग्रही असून आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गांना तशा सुचना देत आहेत. तसेच अनियमितता आढळल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्गावर अध्यक्षाकडून थेट कारवाई केली जात आहे.
दरम्यान, नळगीर प्राथमिक केंद्र अंतर्गत ३ हजार ३६६ नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.टिकोरे यांनी दिली आहे. संबंधित सर्वांना आवश्यक काळजी घ्यावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत असे त्यांनी तपासणी दरम्याण सांगितले आहे.
होम क्वारंटाईन केलेले नागरिकांकडून असहकार, अनेक सरपंच साथ देत नाहीत..
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परंतू, त्यांनी असहकार धोरण स्वीकारले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन केले जात नाही. तसेच, काही ग्रामपंचायतीही उदासिन असून आवश्यक पावले उचलले जात नसल्याचे स्पष्ट मत डॉ. टिकोरे यांनी अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्यापूढे नमूद केले.
सज्जावर राहणे बंधणकारक असतानाही गैरहजर असलेल्या ग्रामसेवकाची कानउघडणी..
भेटी दरम्याण नळगीरचे ग्रामसेवक पवार यांची गैरहजरी राहूल केंद्रे यांना चांगलीच खटकली. सज्जावर राहण्याचे लेखी आदेश असतानाही त्यांनी आदेशाला केराची टोपली दाखवल्याने राहूल केंद्रे यांनी ग्रामसेवकाला जाग्यावरुन फोन केला. संबंधित ग्रामसेवकाकडे दोन गावे आहेत. परंतू, एकाही सज्जावर उपस्थित नसल्याचे दिसून आल्याने संबंधित ग्रामसेवकांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. गावात अद्याप कसलीच उपाययोजना संबधित ग्रामसेवकाने राबविली नसल्याचे आढळून आले असून सज्जावर गैरहजर दिसून आल्याने ग्रामसेवकावर आपत्ती व्यवस्थापण कायद्यानुसार कारवाई होणार का.? याकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी भाजपाचे ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, प्रा.पंडित सुर्यवंशी, भाजपा शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, डॉ. टिकोरे, नळगीर गावातील पत्रकार संतोष वळसने, संतोष कोतलापुरे, राजीव शेटकार, संतोष पांडे, दस्तगीर शेख यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.