उदगीर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

                             उदगीर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद(प्रतिनिधी) : कोरोना व्हायरस ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार उदगीर शहरातील व्यापारी आणि खरेदीदार यांनी पुढील आदेश येईपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा स्वयंस्फूर्तपणे निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई पुण्यावरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. ज्या बसेस मधून मोठ्या शहरातून प्रवासी आले आहेत, त्या बसेसला लगेच फवारून निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. उदगीर शहरातील नागरिकांनी आजपासूनच अनावश्यक बाहेर फिरणे बंद केले आहे. यासाठी वेळोवेळी महसूल प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने जनतेला आवाहन केले जात आहे. परिणामतः दुपारी दोन वाजल्यापासून शहरात बंदचे स्वरूप आले आहे.कोरोना व्हायरसच्या संदर्भात जनजागृती करणे आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्यासोबत राष्ट्राचे हित जोपासणे, यासाठी घराबाहेर न पडणे चांगले आहे. कोरोना व्हायरस बद्दल अजूनही ही म्हणावा तेवढ्या गांभिर्याने विचार केला गेला जात नसल्याची खंतही प्रशासनाने व्यक्त केली आहे. एक राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे .असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगे शेट्टी यांनी केले आहे.