श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी राबवला कोरोना विषाणूचा उपक्रम.

श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी राबवला कोरोना विषाणूचा उपक्रम.



उदगीर/ प्रतिनिधी ...
बी.एन.सुवर्णकार  ..उदगीर येथील एम.एस.पी. मंडळामार्फत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर च्या शिक्षकांनी सार्वजनिक आरोग्य विभाग, नागरी आरोग्य प्राथमिक केंद्र. नगर परिषद, उदगीर यांच्या सूचनेनुसार कोरोना विषाणू संसर्गजन्य उपचारासाठी व त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या परिसरात असलेल्या प्रत्येक घरात जाऊन खोकला, ताप, श्वासोच्छ्वास अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास उपचार घेण्यास नजीकच्या नागरि आरोग्य प्राथमिक केंद्र असलेल्या आपल्या जवळील संपर्क साधण्याचे माहिती शिक्षक देत आहेत. स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी साबण व पाणी वापरून आपले स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा, सर्दी किंवा फ्लू सुदृश्य असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा, मांस व अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा इत्यादींची माहिती शिक्षक व एका परिपत्रकाद्वारे करत आहेत. खोकल्यावर अथवा शिंकल्यानंतर एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक तयार करण्यापूर्वी किंवा करताना आणि तयार केल्यानंतर प्राण्यांचा सांभाळ केल्या नंतर आणि प्राण्यांची विष्ठा काढल्या नंतर आपले हात स्वच्छ धुवून स्वतःचे आणि इतरांचे आजारी पडण्या पासून संरक्षण करण्याचा अशी सल्ला देत आहेत. लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारीने वागू नयेत . उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयासाठी त्वरित संपर्क साधण्याचा सल्ला देत आहेत. शिक्षकांनी हा उपक्रम राबवत असल्याने परिसरात कौतुक होत आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवदे(पाटील) शुक्ला, याच बरोबर शाळेतील शिक्षक राजराम भोसले, शिवाजी दाडगे, प्रकाश भंडारे, माधव घुळे, भागवत ढगे, यशवंत वाघमारे, कालिदास सोमवंशी, नागनाथ सोमवंशी, महेश जगळपुरे, सुनील बिरादार, बालाजी सुवर्णकार, गौसोद्दीन तांबोळी, शिवाजी दाडगे, शिक्षिका कुसुम फरकांडे, उषा बोळेगावे, सुनीता तेलंग, मीना गायकवाड इ. पुढाकार घेतला आहे.