पुणे | आज पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित असलेल्या 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे, तर महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 9 वर पोहोचली आहे.या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला अनेक व्याधी असल्याचं सांगण्यात येत आहे,त्यांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यातचं त्यांना कोरोनाची लागण झाली. पुण्यात कोरोनाची सुरूवात झाली आणि आज पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.