बेशिस्त जनतेवर कठोर कार्यवाही करा- निवृत्ती सांगवे

बेशिस्त जनतेवर कठोर कार्यवाही करा- निवृत्ती सांगवेउदगीर/प्रतीनीधी.. जगभर कोरोनाचे मोठे संकट ओढवले असुन केंद्र व राज्य सरकारने ही साथ थांबविण्या साठी संचारबंद लागु केली आहे. मात्र अशा अनिबाणीच्या काळात जनता गंभीर नसल्याचे दिसुन येत आहे. त्यासमोर पोलिस प्रशासनही हातबल झाल्याचे जानवत असून या महामारीला रोखण्यासाठी बेशीस्त जनतेच्या विरोधात अधिक कठोर निर्णय घेण्याची मागणी नगरसेवक निवृत्ती सांगवे यांनी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
       करोना सारख्या जागतीक महामरीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आहे. यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी देशात लाॅक डाऊन केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारने एकवीस दिवसासाठी संचारबंदी लागू केली आहे. काही काळासाठी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकांना सूट देण्यात आली आहे. मात्र उदगीर शहरातील जनता बेशिस्त वागत असून मोठ्या प्रमाणात जमावाने बाहेर पडताना दिसून येत आहे. त्यांना या जागतिक महाभारी चे गांभीर्य लक्षात येत नसून ते भविष्यातील मोठे संकट ओढवून घेणार आहेत. त्यांच्यामुळे समाजाला धोका निर्माण होत असून अशा बेशिस्त वागणाऱ्या व जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त पानटपऱ्या, चोरून दारू विकणारे, या संकट समयी धान्याचा काळाबाजार करीत जीवन अवश्यक वस्तु चढ्या भावाने विकणार्‍या व मास आणि सनिट्यझर बेभाव विकणार्‍यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. 
        कोरोना संक्रमन रोखण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना करीत असली तरी उदगीर मध्ये शासनाच्या अदेशाला केराची टोपली दाखवीजात आहे. जनता बेशिस्तवागत आहे. पोलिस प्रशासनही हातबल झाल्याचे जानवत आहे, त्यामुळे संचारबंदी आदेश न जुमानार्‍या लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे पत्र सांगवे यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे.