लातूर जिल्हा भाजपाची जंबो कार्यकारणी जाहीर

लातूर जिल्हा भाजपाचीजम्बो कार्यकारिणी जाहीर


संजय दोरवे, रामचंद्र तिरुके, प्रकाश पाटील, राचट्टे यांच्यासह 115 जणांचा समावेश



     लातूर. दि.२० – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी *लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची ११५ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर* केली असून या कार्यकारिणीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समतोल न्याय देऊन सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.
           कोरोनो संसर्गामुळे जिल्हा कार्यकारिणीतील मोजक्‍याच नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना जिल्हाध्यक्ष रमेशअपा कराड यांच्या हस्ते शुक्रवारी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, जिपचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे, माजी सभापती प्रकाश देशमुख, जिपचे सभापती गोविंद चिलकुरे, राहिदास वाघमारे, भाजपा किसान मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, युवा मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष अॅड. ज्ञानेश्‍वर चेवले, अनुसूचित जाती मोर्चा अध्‍यक्ष बालाजी गवारे, ओबीसी मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष बापुराव राठोड, अॅड.मुक्‍तेश्‍वर वागदरे, किरण उटगे, विजय क्षिरसागर यांच्‍यासह अनेकजण उपस्थित होते.
       जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी पुढीलप्रमाणे -
      *सरचिटणीस* - संजय दोरवे (संघटन) निलंगा, रामचंद्र तिरुके देवणी, त्र्यंबक गुट्टे अहमदपूर, शामल कारामुंगे उदगीर, अशोक केंद्रे अहमदपूर, प्रा. विजय क्षिरसागर (कार्यालय प्रमुख),   *उपाध्यक्ष* – हनुमंत नागटिळक लातूर, सोमेश्‍वर सोप्‍पा जळकोट, गोविंद नरहरे लातूर, ऋषिकेश बद्दे शिरुर अनंतपाळ, पंडितराव सुकणीकर उदगीर, तुकाराम पाटील देवणी, प्रकाश पाटील औसा, सौ. ललिता कांबळे रेणापूर, सुनिल पाटील चाकूर, वसंत करमुडे रेणापूर, भिमाशंकर राचट्टे औसा, हणमंत हंडरगुळे उदगीर, सतिष अंबेकर रेणापूर, सुनिल उटगे औसा, रंजीत मिरकले चाकूर, सौ. जया काबरा उदगीर, वसंत डिघोळे चाकूर, सुरेंद्र गोडभरले रेणापूर, अनिल भिसे रेणापूर, शेषेराव ममाळे निलंगा, बालाजी पाटील चाकूर, भागवत सोट लातूर, काकासाहेब मोरे औसा, विजय काळे लातूर, अरविंद कुलकर्णी औसा.
       *चिटणीस* - सोमनाथ पावले औसा, चंद्रसेन लोंढे लातूर, बाबासाहेब देशमुख लातूर, शाहूराज पाटील निलंगा, अशोक चिंते चाकूर, अ‍ॅड. मोहिनी पाठक औसा, सुमनबाई सोनेवाड अहमदपूर, सौ. उषा रोडगे उदगीर, श्रीमंत नागरगोजे रेणापूर, अमर नाडे लातूर, साईनाथ चिमेगावे उदगीर, गणेश गायकवाड उदगीर, सुर्यकांत शिंदे औसा, तुकाराम मद्दे चाकूर, विश्वनाथ चाटे जळकोट, शरद जोशी अहमदपूर, राजकुमार राजारुपे चाकूर, भगवान सोळंके अहमदपूर, व्यंकटराव सोनवणे चाकूर, अंकूश जनवाडे चाकुर कोषाध्‍यक्ष - व्‍यंकटगीर गिरी निलंगा, *प्रसिद्धी प्रमुख* – चंद्रकांत कातळे रेणापूर.
        या *कार्यकारिणीत सदस्य* म्हणून गोविंद पोतदार शिरुर अनंतपाळ, सय्यदअमीर पटेल निलंगा, सुर्यकांत भोसले देवणी, सौ. संगिता घुले रेणापूर, सौ. ज्योती राठोड उदगीर, एन.एन. पाटील शि.अनंतपाळ, दिलीप मोगरगे निलंगा, रोहिदास वाघमारे चाकूर, सौ. विमल पाटील चाकूर, सौ. विजया बिराजदार उदगीर, पृथ्वीराज शिवशिवे देवणी, प्रशांत पाटील देवणी, राजीव कांबळे शि.अनंतपाळ, सौ. अरुणा कांबळे चाकूर, सौ. मुद्रिका भिकाणे अहमदपूर, सौ. धनश्री अर्जुने चाकूर, सुरेश लहाने रेणापूर, सौ. अरुणा शिंगडे लातूर, सौ. मणिषा वाघमारे, सौ. प्रिती शिंदे लातूर, सौ. कल्पना कांबळे औसा, सौ. दैवशाला कोलपाक औसा, सौ. कुसुम हालसे निलंगा, धोंडीराम बिराजदार निलंगा, संतोष वाघमारे निलंगा, सौ. अरुणा बरमदे निलंगा, महेश पाटील औसा, बस्वराज बागबंदे, सौ. अनिता परगे जळकोट, रमेश सोनवणे रेणापुर, अनंत चव्हाण रेणापूर, सौ. गंगासागर जाभाडे अहमदपूर, बालाजी गुट्टे अहमदपूर, सौ. जमुनाबाई बडे चाकूर, सज्जन लोणाळे चाकूर, सौ. राधा बिराजदार निलंगा, सौ. अश्विनी कासनाळे अहमदपूर, सौ. मिनाक्षी रेड्डी अहमदपूर, सौ. रुपाली पवार, नितीन रेड्डी चाकूर, सौ. आरती राठोड रेणापूर, अभिषेक अकनगिरे रेणापूर, बाळासाहेब शिंगाडे निलंगा यांचा समावेश करण्यात आला आहे.
        जिल्हा कार्यकारणीत *विशेष निमंत्रीत सदस्य* म्हणून माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी आमदार पाशा पटेल, आ. अभिमन्यु पवार, माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार सुधाकर भालेराव, टी. पी. कांबळे, बब्रुवान खंदाडे, विनायक पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे आणि उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके यांना विशेष म्हणून घेण्यात आले आहे.   
         भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी जिल्ह्यात भाजपाच्‍या संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून पुन्हा एकदा लातूर जिल्हा भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून कायम राहील या दृष्टीने सक्षम  प्रभावी  आणि सक्रिय  कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या पक्षाच्‍या विविध पदावर केल्या आहेत.