कोरोना सारख्या व अनेक आजाराच्या पार्श्वभुमीवर, उदगीरला सर्व सोईनी सुसज्ज रुग्णालय लोकसहभागातून होणे अत्यंत गरजेचे.
कोरोना सारख्या व अनेक आजाराच्या पार्श्वभुमीवर, उदगीरला सर्व सोईनी सुसज्ज रुग्णालय लोकसहभागातून होणे अत्यंत गरजेचे.
कोरोना या आजारावर बोलत असताना, उदयगिरि मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर माधव चंबुले म्हणाले की, आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला कोरोना या विषाणू संसर्ग रोगाने घेरलेले आसून परेशान केलेले आहे. या रोगाची व्याप्ती ही प्रत्येक राष्ट्रात वरचेवर वाढत आहे. महाराष्ट्राची संख्या पण या रोगाने वाढत चाललेले चित्र दिसून येत आहे. भारत सरकार व देशातील सर्व राज्य या आजाराने परेशान झालेले दिसुन येत आहे. पुरेशी खांटाची व्यवस्था नाही. म्हणून कोरोणाच्या रुग्णांना औरंगाबाद, पुणे, मुंबई जेथे खाटांची व्यवस्था आहे, तेथेच पाठवावे लागणार आहे. त्यादृष्टीने कोरोना या आजारावर किंवा भविष्यात येणाऱ्या मोठ्या आजारावर उदगीर सारख्या ठिकाणी सर्व सोईनी उपलब्ध असे रुग्णालय नाही. अशा महाभयंकर रोगासाठी सुसज्ज व सर्व मशनरीच्या सोईनी उपलब्ध अशा रुग्णालयाची आवश्यकता आहे. आज काही लोकाकडे पैसा असून देखील, या आजारावर मात करण्यासाठी कुठल्याच सोयीने परिपूर्ण असलेले रुग्णालय उदगीरला उपलब्ध नाही. म्हणून आज आपणाकडे पैसा असून देखील या आजारावर सुसज्ज असे रुग्णालय नसल्यामुळे,आपण या आजारावर मात करू शकत नाही. अश्या कोरोना रुग्णांना बाहेर ठिकाणी जिथे सोय आहे तेथेच पाठवावे लागत आहे. आज एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोना सारखा आजार झाल्यानंतर त्याचे कुटुंबातील किंवा इतर व्यक्ती त्याचे जवळ जाऊ शकत नाहीत. आपल्याकडे मुबलक पैसा असून देखील त्यावर इलाज करू शकत नाही. म्हणूनच माननीय पंतप्रधान मोदीजीनी लॉकडाऊन हाच एक उपाय असल्याचा त्यांनी भारतीय जनतेला सांगितलेला आहे. परंतु देशाचे चित्र दररोज दूरचित्रवाहिनीवरून पाहिल्यास याचे तंतोतंत पालन करीत असलेलेचे जनतेत दिसून येत नाही. त्यामुळेच रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आपण जिल्हा पातळीवर, विभागीय पातळीवर, किंवा राज्यपातळीवर या रुग्णांना किंवा भविष्यात येणाऱ्या कुठल्याही आजारावर सुसज्ज अश्या उदगीर तालुका पातळीवर रुग्णालयाची इमारत नाही. त्यासाठी या उदगीर शहरातील सर्व जनतेला अश्या आजारापासून सोय देण्यासाठी सर्व सोयीयुक्त असलेली रुग्णालयाची इमारत उभा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी या उदगीर व ग्रामीण भागातील जनतेला रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसेवा देण्यासाठी या भागातील दानशूर व्यक्ती, उद्योजक या व्यक्तीनी पुढे येऊन सर्वसोयी उपलब्ध असलेले रुग्णालयाच्या इमारतीसाठी मदत केल्यास, निश्चितच भविष्यात एकही रुग्ण बाहेर गावी न जाता त्याच्यावर उपचार उदगीर येथेच केला जाईल,व हे रुग्णालय भारतातील रुग्णांना सेवा देणारे पहिले रुग्णालय ठरेल असा मला विश्वास आहे असे डाॕ.चंबुले यांनी सांगितले.पुढे बोलताना डाॕ.चंबुले म्हणाले की भविष्यात अनेक रोगांना मात करणारे रुग्णालय झाल्यास, मी स्वतः त्या रुग्णालयाचा डिन म्हणून काम करण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. निश्चितच उदगीर येथील दानशूर व उद्योजक व्यक्ती पुढे येऊन, जनतेची रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी एक भव्य, दिव्य, सर्व सोईनी उपलब्ध असे रुग्णालय उभा करण्यासाठी, सहकार्य करतील असे मला वाटते. अशी प्रतिक्रिया डॉक्टर माधव चंबुले यांनी मुलाखत देताना व्यक्त केली.