लातूर जिल्ह्यात लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करा
करोनामुक्तीसाठी सुरू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचे लातूर जिल्ह्यात तंतोतंत पालन करावे असे निर्देश लातूर पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
सामान्य नागरिकांना लॉकडाऊनचा त्रास होणार नाही याकडेही त्यांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले आहे. पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर हात उगारणे, काठी उगारणे असे प्रकार होऊ नयेत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या आहेत.
नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करावे आणि करोना व्हायरस च्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत शासन-प्रशासन आणि पोलीस यांना सहकार्य करावे, नागरिकांनी या काळात आपल्या घरीच राहावे स्वतः बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. करोना व्हायरस विरोधात सुरू असलेली जिंकण्यासाठी या अडचणीच्या काळात सर्वांच्या एकजुटीची आणि सहकार्याची गरज आहे.
--अमित विलासराव देशमुख
(पालक मंत्री, लातूर जिल्हा)