‘तरुणीकडे पाहून का हसत होता, तिची छेड काढतो का’, असे म्हणत तरुणाला मारहाण करत त्याच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी साडे पाचच्या सुमारास पिंपरी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळवे गुरुवारी दुपारी साडे पाचच्या सुमारास पिंपरी भाजी मंडई येथील वाहन पार्किंग समोर थांबले होते. त्यावेळी आरोपी बॉबी आणि अस्पीत बुलेटवर आले. ‘तुझ्याकडे काम आहे, आमच्या सोबत चल’, असे म्हणत साळवे यांना बुलेटवर बसवून लिंक रोड येथील वखारी जवळ एका कंस्ट्रक्शन साइटमध्ये घेऊन गेले.
तिथे अगोदरपासून असलेल्या जग्या याने फिर्यादी उतरताच ‘ट्विंकलकडे पाहून का हसत होता, तिची छेड काढतो का,’ असे म्हणत तिघांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अस्पीत याने लोखंडी रॉडने, जग्या याने लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण केली. त्यावेळी हॅपी सिंग तिथे आला. त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने दोन वेळा मारून जखमी केले.
यानंतर सर्व आरोपी फिर्यादी यांना तिथेच सोडून निघून गेले. फिर्यादी यांचे वडील विष्णू साळवे आणि लहान भावाला देखील आरोपी रोमी सिंधी, काळ्या पाजी, हॅपी संधू, बॉबी संधू, अस्पीत, जग्या यांनी मारहाण केली