कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
नरसिंगवडी येथिल शेतकऱ्यांना मोफत मास्क वाटप.
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मास्क व सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत पण ग्रामीण भागातील लोकांना या विषाणूबद्दल जागरूकता व्हावी या दृष्टीने आमचे मित्र सध्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले वेदांत श्रीगिरे यांनी तब्बल 1000 मास्क स्वतः तयार करून वाटप करण्याचा संकल्प केला आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज उदगीर तालुक्यातील नरसिंगवाडी या गावी जाऊन मोफत मास्क वाटप करून मास्क बनवण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले व या विषाणूची लागण होऊ नये यासाठी घ्याव्या लागणाऱ्या बाबी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी "आधार ग्रुप" चे अध्यक्ष श्रीकांत जाधव,ग्राम पंचायत सदस्य वामन पाटील,विरभद्र हालकुडे,बबनराव नरवटे,लक्ष्मण कोलेवाड,डॉ.अभिजीत नरवटे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.