श्री गुरु हावगीस्वामी मठात दासोह(भोजन)

श्री गुरु हावगीस्वामी मठात दासोह(भोजन)



उदगीर(प्रतिनिधी) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या संचार बंदीमुळे गोरगरीब अनाथ बेघर व शिक्षणासाठी शहरात राहिलेले विद्यार्थी तसेच बाहेरगावी जाणारे परंतु शहरात अडकलेल्या नागरिकांना श्रीगुरुहावगी स्वामी मठात सकाळी नऊ ते बारा व रात्री 7 ते 9 दररोज भोजन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्रीगुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी केली आहे
श्री गुरु हावगीस्वामी मठात गेल्या एक वर्षापासून दररोज दासोहची व्यवस्था करण्यात आली आहे दररोज नऊ ते बारा या वेळेत भोजन व्यवस्था चालू आहे संचार बंदीमुळे दररोज दोन वेळा भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी नऊ ते अकरा व रात्री 7 ते 9 या वेळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहेत. नागरिकांनी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडू नये तसेच ईश्वराच्या नामस्मरणात व ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपला वेळ व्यतीत करावा असे आवाहन डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.