तोंडार येथे ओम साई सेवाभावी संस्था च्या वतीने गरजू व्यक्ती ना 400 जीवनावश्यक वस्तू किट चे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वाटप
तोंडार येथे ओम साई सेवाभावी संस्था च्या वतीने गरजू व्यक्ती ना 400 जीवनावश्यक वस्तू किट चे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वाटप
उदगीर: आज गोर गरीब लोकांना, मोलमजुरी करून खानार्या लोकांवर कोरोना व्हॉयरस मुळे उपासमारीची वेळ आली असल्याने आज सर्व राज्यांत गरजवंताना दातृत्वाचा आधार देणारे लोक बाहेर पडून कोठे अन्न धान्य, तर कोठे जेवन, उपहार देउन त्यांची भुक भागवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यात उदगीर तालुक्यातील तोंडार येथील प्रत्येक वेळी गोर गरीब लोकांना व गरजवंताना दातृत्वाचा आधार देणारे ओम साई सेवा भावी संस्थेने हात पुढे करत गावातील ४००लोकांना जीवनावश्यक ची किट वाटप करण्यात आले त्या वेळी जिल्हा परिषद चे अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे यांनी आपलं मत व्यक्त केले.यावेळी तोंडार जिल्हा परिषद सदस्य बस्वराज बिरादार, सरपंच माधव पटवारी, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ साहेब, पोलीस उपनिरीक्षक गित्ते साहेब, मा.पं.स.सदस्य राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील, ग्राम सेवक सी.सी.शेळके, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे ई मान्यवरांच्या हस्ते अन्न धान्य किट चे प्रत्येक लोकांचा घरी जाऊन सोषेल डिस्टन्स चे नियम पाळुन वाटप करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना राहुल भैय्या केंद्रे सांगितले की आज देश आर्थिक संकटात सापडला आहे, कोरोना व्हॉयरस मुळे अनेक गोर गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, हाताला काम नाही, लॉक डाउन मुळे प्रत्येकानं आपल्या घरी बसण्याची वेळ आली आहे, त्यामुळे गोर गरीब लोकांची भूक भागवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी सामजिक सस्थेनी पुढे येण्याची गरज आहे, आज या ओम साई सस्थेचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, आज यांनी गावात अनेक लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे,गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे, अनेक शाळा अंगणवाडी या रंगरंगोटी करून डिजिटल केल्या आहे, असच जर प्रत्येक सस्थेणी मदत केली तर या कोरोना चा जाळ्यात अडकले लोक उपाशी राहणार नाहीत असे त्यांनी सांगितले.
या वेळी सस्थेच शिवलिंग नवंदे, कैलास खींडे, रामेश्वर बिरादार, नीलकंठ बिरादार,वीरभद्र बिरादार, संदीप अंबेशेत, गोविंद पांडे, ई सह गावातील मित्र परिवार उपस्थित होते.