हातभट्टी अड्ड्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांची धाड पोलिसांची धाड 45 हजार रुपयाचा रसायन नष्ट



हातभट्टी अड्ड्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांची धाड पोलिसांची धाड 45 हजार रुपयाचा रसायन नष्ट



उदगीर प्रतिनिधी : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  लागू करण्यात आलेल्या संचार बंदीमुळे तळीरामांना दारू उपलब्ध होत नसल्यामुळे  अस्वस्थ झालेले तळीराम  मोठ्या प्रमाणावर हातभट्टीवर तावमारत असल्याची माहिती मिळाल्यावरून ... उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी तांडा वस्त्यावर  हातभट्टीची निर्मिती करणाऱ्या व शहर व परिसरात अवैध मार्गाने विकणाऱ्यावर ... उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या पथकाकडून तालुक्यातील  बोरतळातांडा येथील  अवैध हातभट्टी दारू बनवणाऱ्या अड्डयावर धाड टाकून हातभट्टी बनवण्यासाठी उपयोगात येणारे 45000 रुपयाचे रसायन नष्ट करण्यात आले याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे