लातूर येथे कोरनाचे 8 रुग्ण कोरोना बाधित  20 व्यक्तींच्या स्वॅब  नमुन्यांपैकी 12 निगेटिव्ह, तर 8 पॉझिटिव्ह

लातूर येथे कोरनाचे 8 रुग्ण कोरोना बाधित 


20 व्यक्तींच्या स्वॅब  नमुन्यांपैकी 12 निगेटिव्ह, तर 8 पॉझिटिव्ह



लातूर, दि.4:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 3 एप्रिल 2020 रोजी रात्री 20 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.... ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत काल रात्री पाठवण्यात आले.... त्यापैकी बारा व्यक्तींचे नमुने निगेटिव आलेले आहेत ....तर उर्वरित आठ व्यक्तीचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत....तसेच त्या सर्व रुग्णांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ॲडमिट करण्यात आले ..... सध्या त्या रुग्णांची प्रकृती स्टेबल असल्याची  माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.......लातूरमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नव्हता ...पण आज लातूर येथे आठ जण कोरोना पॉझिटिव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली  असल्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ ..आठही जण दिल्ली येथील कार्यक्रमांमधून निलंगा येथे आले होते ...त्या आठ जनांच्या संपर्कात कोण कोण आले होते त्यांचाही शोध सुरू आहे......सकाळी जिल्हाधिकारी जि श्रीकांत यांनी सोशल मीडियावर आपला व्हिडिओ व्हायरल केला होता की निलंगा येथे आलेल्या सर्व व्यक्तींना लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगीतले होते . . .


 जनतेनी घाबरू नये आसे अव्हानही केले होते,त्यामध्ये विस जनांपैकी आठ जनांचा रिपोर्टर पॉजुटिव्ह आला आहे


  निलंगा येथे आल्यानंतर ज्या धार्मिक स्थळत राहिले होते ... तेथे कोणा कोणाच्या संपर्कात आले होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही....