लोणीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राशन आपल्या घरपोच दारी राशनचे वाटप उदगीर(प्रतिनिधी) तालुक्यातील लोणी येथे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी तहसीलदार व्यंकटेश मुंडे मंडळाधिकारी शंकर जाधव तलाठी अनिल मे कलवार व कार्यालयातील कर्मचारी कौरे यांच्या उपस्थितीत स्वस्त धान्य घरपोच वाटपाची सुरुवात करण्यात आली. कोरोनासारखी महाभयंकर जागतिक आपत्ती आली असताना अशा परिस्थितीमध्ये लोणी येथील बी आर पाटील स्वस्त धान्य दुकान यांच्यावतीने शासनाचे स्वस्त तांदूळ व गहु धान्य वाटप करण्यात येत आहे लॉकडाउन चालू असल्याकारणाने स्वस्त धान्य दुकानावर येऊन लोकांची गर्दी होईल या पासुन कोरोना विषाणु चा संसर्ग होवु नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वाहनाची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे व गावातील लोकांच्या घरोघर जाऊन स्वस्त धान्य तांदुळ व गहु वाटप करण्यात येत आहे याची सुरुवात वरील अधिकार्याच्या हस्ते करण्यात आली. सध्या रेगुलर पद्धतीचे राशन वाटप चालू असून यानंतर दारिद्र रेषेखालील व अंतोदय मध्ये नाव असलेल्यांना प्रति माणूस पाच किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे तसेच ज्यांचे कडे राशन कार्ड नाही व ज्यांचे नाव ऑनलाईन मध्ये नाही अशा लोकांना सध्यातरी राशन वाटपाच्या आदेश आलेला नाही तरी त्यांच्यासाठी गावकऱ्यांनी मदत करावे असे आव्हान उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले या कार्यक्रमासाठी स्वस्त धान्य दुकानदार बालाजी पाटील सरपंच माधव पाटील उपसरपंच सोपान फड गणेश पटवारी नरसिंग कांबळे दिलीप गुलफुरे पुरणदास उदासी गनिमियाँ शेख जावेद शेख ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानोबा लोणीकर तिरुपती साताळे वैजनाथ सोलापूर माधव सोलापुरे बाळू गायकवाड मुख्याध्यापक संजय वाघमारे शिवकांत मुळे यमुनाजी भुजबळे बालाजी वाघमारे अंकुश केंद्रे इत्यादी गावकरी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक राशन कार्ड धारकाना तादूळ व गहू वाटप करुन सहकार्य करणार आहेत तरी राशन आपल्या दारी याच्या फायदा गोरगरिब कूटुंबाना मोठ्या प्रमाणात होणार आहे असे मत लोणीचे संरपंच माधव पाटिल यानी मांडले