जनतेने प्रशासनाचे आदेश पाळावेत --गजानन पाटील

   जनतेने प्रशासनाचे आदेश पाळावेत --गजानन पाटील  उदगीर शहरात आणि ग्रामीण भागात लॉक डाउन असताना विनाकारण काही लोक घराबाहेर पडत आहेत. ही गोष्ट समाजासाठी अत्यंत घातक आहे. आज भारत देश संकटातून जात असताना आपण भारतीयांनी राष्ट्रीय भावना जपून प्रशासनाचे येणारे आदेश पाळावेत, आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांनी केले आहे. नको तिथे गर्दी करणाऱ्या आणि अनावश्यक शहरातून फेरफटका मारणाऱ्या टुकार प्रवृत्तीच्या लोकांना समाजातील इतर लोकांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी पोलीस प्रशासनाला थोडीशी कठोर भूमिका घ्यावी लागणे गरजेचे असल्याने, पोलीस येणाऱ्या जाणाऱ्यांना चौकशी करत आहेत. मात्र जनता सहकार्य न करता पोलिसांची उद्धटपणे बोलून पोलिसांचीच औकात काढत आहेत. ही गोष्ट खेदजनक आहे. महसूल प्रशासनाने नगरपालिकेने घरपोच किराणामाल पोहोचवण्याची योजना केली असतानादेखील नको त्या कारणाने घराबाहेर फिरणाऱ्या लोकांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या आदेश पाळावेत. अशी विनंती ही  गजानन पाटील यांनी केली आहे.