ग्रामपंचायत करडखेल व सरपंच दयानंद कसबे यांच्यासह कर्मचाऱ्यांतर्फे कोरोना जनजागृती मोहीम

ग्रामपंचायत करडखेल व सरपंच दयानंद कसबे यांच्यासह कर्मचाऱ्यांतर्फे कोरोना जनजागृती मोहीम


संपूर्ण जगात धूमाकूळ घालत असलेल्या कोरोना या रोगाने संपूर्ण जग ग्रासलेले असताना आपले गाव व समाज सुरक्षित रहावा यासाठी करडखेल येथील यूवा सरपंच यांच्यामार्फत गावात विविध उपक्रम हाती घेवून कोरोनाला थांबविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
गावामध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे तसेच बाहेर गावाहून आलेल्या लोकांची माहिती व तपासणी स्वत: प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करणे,सर्व किराणा दूकानदारांना माल योग्य भावात विकावा यासाठी सूचना देणे,स्वत:च्या खर्चातून ध्वनिक्षेपक व आॅटोची व्यवस्था करुन गावभर आपल्या कर्मचाऱ्यासह फिरणे व कोरोनाविषयक जनजागृती तसेच घराबाहेर पडू नये यासाठी आवाहन,गावात काहीही अफवा पसरली असता त्याठिकाणी स्वत: जावून शहानिशा करुन खरी माहीती लोकांपर्यंत पोहचविणे,संपूर्ण गावात अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्ती,सुभाष कांबळे (पाणीपूरवठा), मनोहर कसबे (ग्रामरोजगार सेवक),वर्धराज कांबळे (संगणक परिचालक) यांच्या मदतीने दिवसात कमीत कमी एक ते दोन वेळा पिंजून काढले जात आहेत..
   कोरोना या रोगापासून आपला गाव कसा सूरक्षित राहील यासाठी  काही वेळा पोलिसांची सूद्धा मदत घेण्यात येत आहे यासाठी करडखेल बीटचे पो.काॅ. शिंदे यांच्यामार्फत जमावबंदीसाठी  गावात पोलीसांची गस्त व अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळत असल्याचे सरपंच दयानंद कसबे यांनी म्हटले आहे.तसेच सरपंच दयानंद कसबे या यूवा सरपंचामूळे करडखेलवासियांच्या सहकार्याने कोरोना या विषाणूला थांबवण्याचे कार्य केले जात आहे याबद्दल गाव व परिसरातून सरपंचांचे कौतूक केले जात आहे...