उदगीर येथे शिवभोजन थाळी केंद्राचे राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन.. 

उदगीर येथे शिवभोजन थाळी केंद्राचे राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन..


  दि. ०४  - उदगीर येथे गरीब व बेघर लोकांना अन्न उपलब्ध व्हावे तसेच कोणीही उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी केंद्राचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, भुकंप व पुनर्वसन, रोजगार हमी, संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा. ना. संजयजी बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


कोरोना या जागतिक साथीच्या रोगामुळे देशात आणि राज्यात लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे गरीब आणि हातावर पोट असलेल्या मजूर लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशिल  आहे.


अशा गरजु व बेघर असलेल्या लोकांना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजनेतून कमीत कमी किंमतीत  जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


यावेळी लातूर जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांतजी,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषजी जोशी, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपविभागीय अधिकारी प्रविणजी मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेशजी मुंढे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वरजी पाटील, ता. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे सर,  कॉंग्रेस शहर अध्यक्ष मंजुरखाॅं पठाण, कॉंग्रेस ता. अध्यक्ष कल्याणजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष समीरजी शेख, उद्योजक रमेश अंबरखाने, तसेच काॅंरवां ग्रुप यांच्या सह मान्यवर इतर अधिकारी उपस्थित होते.