समाजातील गरजु लोकांपर्यंत अन्न धान्याचा पुरवठा करा. राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे यांच्या प्रशासनाला सुचना
समाजातील गरजु लोकांपर्यंत अन्न धान्याचा पुरवठा करा.
राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे यांच्या प्रशासनाला सुचना
दि. ०४ - कोरोना या विषाणु च्या साथीच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लाँकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी गरीब व गरजु व्यक्ती अन्नधान्य शिवाय राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी तसेच ज्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातील धान्याची गरज नाही अशा नागरिकांची नावे यादीतून वगळण्यात यावीत.
तसेच या संदर्भातील सर्वेक्षण दोन दिवसात पुर्ण करण्यात यावे असे निर्देश ना. संजयजी बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
उदगीर व जळकोट तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामधील उपलब्ध अन्नधान्य साठ्याबाबत आढावा घेण्यात आला. व उदगीर येथील रास्त भाव दुकानास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत , उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेशजी मुंढे, माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वरजी पाटील, ता. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, कॉंग्रेस शहर अध्यक्ष मंजुरखाॅं पठाण, कॉंग्रेस ता. अध्यक्ष कल्याणजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष समीरजी शेख, अनिल मुदाळे, कुणाल बागबंदे, यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
देशात व राज्यात कोरोनाचे संकट महाभंयकर असुन या संकटाचा सामना करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी प्रशासनाच्या सर्व सुचनाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मा.राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.