कोणीही उपाशी राहणार नाही : राहुल केंद्रे

कोणीही उपाशी राहणार नाही : राहुल केंद्रे

उदगीर : कोरोनाच्या संकटात कोणीही उपाशी राहणार नाही, प्रत्येकाला जेवण उपलब्ध करून दिले जाईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही सदैव सोबत आहोत. सध्या कोरोना विरुद्ध लढाईत सर्व नागरिकांनी सरकार व प्रशासनाला मदत करावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. मोदी सरकार व प्रशासन सज्ज आहे. त्याला मदत करावी, आम्ही सदैव सोबत आहोत असा दिलासा युवानेते जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिला.


भाजपाचे अन्न वाटप अभियान लोकप्रिय नेते माजी पालकमंत्री संभाजीभैय्या पाटील निलंगेकर व भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


भारतीय जनता पार्टी उदगीर तर्फे  शहराध्यक्ष उदयसिंग ठाकुर यांनी पुढाकार घेऊन खा.सुधाकर शृंगारे यांच्या सौजन्याने गरजवंताना अन्न वाटप करण्याचा संकल्प केला आहे.


भाजपाचे जेष्ठ नेते नागनाथअण्णा निडवडे म्हणाले की, पक्षाने 5 कोटी लोकांना अन्नवाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी साथ द्यावी असे आवाहन केले आहे.


यावेळी बोलताना बापू राठोड म्हणाले की खासदार सुधाकर श्रुंगारे व राहुल केंद्रे यांच्या पुढाकाराने अन्न वाटप करण्यात येणार आहे. भाजपा व राजीव गांधी तंत्रनिकेतन पूर्ण ताकतीने कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील होणार आहे.


या वेळी उदगीर नगर परिषद चे उपाध्यक्ष सुधीर भाउ भोसले यांनी असे म्हणाले स्वच्छता व सामाजिक जाणिव जागृती अभियान राबवित आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, घरीच बसावे, घराबाहेर येऊ नये असे आवाहन केले.


उदगीर तालुक्यातील व शहरातील कोरोनाच्या संकटात सापडलेल्या दीड हजार गरजू लोकांना अन्न वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योतीताई राठोड, बापुराव राठोड, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवडे, उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, प्रा.पंडित सुरवंशी, नगरसेवक मनोजदादा पुदाले,नगरसेवक अॅड. दत्ता पाटील,नगसेवक रुपेंद्र चव्हाण ,सरचिटणीस आंनद साबणे, विशाल रंगवाळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी भाजपा अन्न वाटप अभियान प्रमुख उदयसिंग ठाकूर म्हणाले की, कोणत्याही गरजवंताला घरपोच जेवण दिले जाईल. शहरातील कोणत्याही गरजू नागरिकाला, जेष्ठ नागरिकाला घरपोच जेवण दिले जाईल. हे जेवण खा.सुधाकर श्रुंगारे यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. तेव्हा कोणत्याही नागरिकाने आमच्याशी सम्पर्क साधावा. आम्ही जेवण उपलब्ध करून देऊ. त्यासाठी या नंबरवर संपर्क साधावा.9404273131