दक्षता समितीच्या सदस्य सौ संगीता नेत्रगावे पाटील यांच्यातर्फे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना संरक्षकला जीवरक्षक कवचाचे
दक्षता समितीच्या सदस्य सौ संगीता नेत्रगावे पाटील यांच्यातर्फे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना संरक्षकला जीवरक्षक कवचाचे
आज दि. ०८/ रोजी करोणाच्या या युद्धात अहोरात्र लढणाऱ्या पोलिसांसाठी मास्क,उन्हापासून बचावासाठी मोठा सुती पांढरा रूमाल, तसेच सानीटायझर याचे वाटप करण्यात आले.
आपला जीव धोक्यात घालून उन्हातानात करुणा सारख्या संसर्गजन्य आजारातही प्राणपणाने कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांसाठी महिला दक्षता समितीच्या सदस्य सौ संगीता नेत्रगावे पाटील यांच्यातर्फे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना वरील साहित्य वाटप करण्यात आले,
यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ. संगीता नेत्रगावे पाटील, सौ. दिपाली औटे, महात्मा पब्लिक स्कूल चे संचालक दिपक नेत्रगावे पाटील, विश्वासअण्णा पडीले, अध्यक्ष स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान, सदस्य बालाजी शिंदाळकर, शहरातील तरुण उद्योजक सुशील पेन्सलवार, व अमीर शेख, लायन्स क्लब झोन चेरमन अभिजीत औटे, व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सुरेखा हाके, व उपाध्यक्ष ज्योती कोळनुरे, व सचिव अनुराधा गोपे तसेच केंद्रे साहेब व पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.